बारामतीत भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ )

471 0

बारामती- बारामतीतील मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मोरगाव रस्त्यावर घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एक ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेने ते सुमारे १०० मीटर लांब फेकले गेले. दुचाकीने त्यांना फरफटत नेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा ३० सेकंदाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडतो.

अपघातानंतर दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!