अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

200 0

अहमदनगर – येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात युवकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने न्यायालयाच्या आवारात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझवली.

ऋषिकेश विठ्ठल ढवण (रा. बाभूळगाव, ता. राहुरी), असे या युवकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात ढवण हा साडेअकरा वाजेच्या सुमारास एका झाडाखाली बसलेला होता. तो अचानक उठला आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे , असे म्हणत त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. स्वतःला पेटून घेतल्याने आग भडकली. तो सैरभैर पळू लागला. ही बाब तेथे नियुक्त असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन माती टाकून आग विझवली, तोपर्यंत हा तरुण मोठ्या प्रमाणात जळालेला होता.

पोलिसांनी तातडीने रुंवाहिका बोलावून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आत्मदहन करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु सदर व्यक्ती ही राहुरी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने तिथे गुन्हा दाखल असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!