मोठी बातमी ! केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

242 0

ठाणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक झाली. या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले. तसेच इतरही राजकीय पक्षांकडून केतकी चितळेवर जोरदार टीका झाली होती. केतकीच्या विरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी केतकीच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. यात तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. ठाणे गुन्हे शाखेकडून केतकी चितळे हिची 8 तास कसून चौकशी करण्यात आली. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील तांत्रिकदृष्टया बाबींबाबत ठाणे सायबर सेलकडून तांत्रिक बाबींचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!