क्या बात है ! कोबी सोलणारे मानवी यंत्र पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल !

433 0

भारतामध्ये खरोखरीच रोबोटची गरज आहे का असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पडणार हे नक्की. या व्हिडिओमध्ये दिसणारी माणसे एखाद्या रोबोट सारखी काम करताना दिसतात. त्यांचा वेग आणि कौशल्य पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल

या व्हिडिओत तीन माणसे कोबी सोलुन ते पोत्यात भरण्याचे काम करत आहेत. जमीनीवर भरपुर कोबी पडलेला आहे. यापैकी एकजण तो वेगाने उचलतोय, दुसरा त्याहीपेक्षा जास्त वेगाने तो कापतोय अन् तिसरा तो वेगानेच पोत्यात भरतोय. या तिघांचा वेग कोणत्याही मशिनला लाजवेल असा आहे. त्यातील कोबी कापणारा व्यक्ती तर सराईतपणे हात चालवतोय. तिघांचे को ऑर्डिनेशन इतके मस्त जमून गेले आहे कि एकदाही या तिघांच्याही हातातून कोबी निसटलेला नाही.

ट्वीटरवरील फक्त ५३ सेकंदाचा व्हिडिओ ६ लाख २५ हजार जणांनी पाहिला आहे. ३७ हजार लोकांनी तो व्हिडिओ लाईक केला आहे.

Share This News
error: Content is protected !!