दाढी मिशांबाबत विनोद केल्याबद्दल भारती सिंहने मागितली माफी, म्हणाली…

489 0

मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह तिच्याच एका जोक्समुळे अडचणीत आली आहे. भारती सिंहने दाढी आणि मिशांबाबत केलेला विनोद तिच्या अंगाशी आला आहे. या विनोदावरून तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भारतीने इंस्टाग्राम पोस्टवरून माफी मागितली आहे.

टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन भारतीच्या एका कॉमेडी शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी भारतीने दाढी-मिशी का नको. दूध प्यायल्यावर दाढी तोंडात घातली तर शेवया टेस्ट येतात. माझे अनेक मित्र ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ते दिवसभर दाढी-मिशीतील उवा काढण्यात घालवतात. अशा आशयाचा जोक भारतीने मारला होता.

त्यावरून शीख समुदाय आक्रमक झाला. भारती सिंहने यावर माफी देखील मागितली होती. मात्र तरीही तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतीने इंस्टाग्रामवरून पहिली पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये भारती म्हणते की, मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तुम्हीही तो व्हिडिओ पहा, मी कुठेही कोणत्याही धर्म किंवा जातीबद्दल बोलले नाही किंवा या कोणत्या धर्माचे लोक दाढी ठेवतात असा उल्लेखही नाही. मी कोणत्याही पंजाबींबद्दल म्हटलं नाही की पंजाबी लोकांना दाढी मिशा आहेत. मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते… माझ्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी हात जोडून माफी मागते.

मी स्वतः पंजाबी असून माझा जन्म अमृतसरमध्ये झाला आहे. त्यामुळे ती पंजाबचा पूर्ण सन्मान करते. मला पंजाबी असल्याचा अभिमान असल्याचेही भारतीनं म्हटलंय.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!