काँग्रेस नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

843 0

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन झाले आहे. दलवाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा, राजशिष्टाचार, बंदरे मंत्री म्हणून यशस्वी पणे जबाबदारी संभाळली होती. दलवाई यांना स्व. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.

17 ऑगस्ट 1922 ला त्यांचा चिपळूण मध्ये जन्म झाला. कोकणातील सुरुवातीच्या काळातील मोजक्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होता. कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेत आमदार, राज्यसभेत व लोकसभेत खासदार व राज्यात मंत्री अशी त्यांची राजकीय दिमाखदार कामगिरी राहिली आहे.

 

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदारही झाले. यात कार्यकाळात त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. हुसेन दलवाई यांनी राज्यासोबतच केंद्रातही आपला दबदबा निर्माण केला होता. राज्यसभेवर दोन वेळा खासदार म्हणून निवडणून आले होते. लोटे येथे औद्यागिक वसाहत निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा त्यांचा होता.

Share This News
error: Content is protected !!