पुणे- खासगी वाहतूक बंद करून फक्त पीएमपीएमलच्या ई-बसने सिंहगडावर प्रवास करता येईल या निर्णयाच्या विरोधात किल्ले सिंहगड येथे राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. सामान्य नागरीक व शिवप्रेमींच्या जीवाशी खेळणाऱ्या पीएमपीएमलच व वनखात्याच्या ई बस उपक्रमाचा निषेध यावेळी करण्यात आला.
वनविभाग आणि पीएमपीएमलच्या या भोंगळ कारभाराविरोधात राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पाडले. पुढील २ दिवसात लेखी स्वरुपात मागण्यांचा विचार झाला नाही तर पुढील रविवारी परत आंदोलन करण्याचा इशारा महेश पवळे यांनी दिला.
यावेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचो पुणे शहर प्रमुख विक्रम बर्गे, शहर संघटक रणजित टेमघरे यांनी केले तर माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, केयूर बहिरट, प्रमोद जोरी, सचिन शिंदे, सागर काळोखे, स्वप्नील महाडीक, कल्पेश बारावकर, सिध्देश काप, हर्षल तापकीर, धनंजय डोबे, विशाल लोयरे, शुभम चांदेरे, उमेष घारे, कुषाल शिरोळे, अमर निंबाळकर, अनिकेत काळे हे कार्यकर्ते उपस्थित होते.