‘पबजी’ गेमच्या वेडापायी पालघरमध्ये १६ वर्षीय मुलगा इमारतीवरून पडला

477 0

पालघर- पबजी खेळताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १६ वर्षाचा मुलगा जखमी झाला. पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे रविवारी ही घटना घडली आहे.

शादान शेख असं या १६ वर्षीय मुलाचं नाव असून त्याच्यावर पालघरच्या रिलिफ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शादान शिरगाव येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसून पबजी गेम खेळत होता. तो या खेळात इतका गुंग झाला की आपण इमारतीवर आहोत याचाही त्याला विसर पडला. खेळता खेळता तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या गेमचे अनेकांना वेड लागले असून त्या वेडापायी अनेकजण घरातून निघून गेले आहेत. अलीकडेच एक अल्पवयीन मुलगा पबजी खेळण्याच्या नादामध्ये रेल्वेत बसून नांदेडहून नाशिकरोड येथे पोहोचल्याची घटना घडली होती. तहान-भूक विसरुन मुलं या गेमच्या नादात तासंतास मोबाइलवर खिळून असतात.

Share This News
error: Content is protected !!