फेसबुक आता हे उपयुक्त फिचर करणार बंद, जाणून घ्या

378 0

नवी दिल्ली- भारतामध्ये फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आता लवकरच फेसबुकचे अनेक अनोखे आणि उपयुक्त फिचर्स बंद होणार आहेत. कोणते फिचर बंद करणार आहेत त्या विषयी जाणून घेऊ या.

ट्विटरवरील अनेक युजर्सच्या पोस्टनुसार, फेसबुकने फेसबुक अॅपवरील सूचनेद्वारे फ्रेंड्स निअरबाय फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. यूजर्सना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये कंपनीने म्हटले आहे की, हे फीचर, जे युजर्सना त्यांच्या जवळपास कोणते मित्र आहेत किंवा कोण प्रवासात आहेत हे शोधण्यात मदत करते, ते आता ३१ मे २०२२ पासून आता उपलब्ध होणार नाही.

वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शन देखील प्लॅटफॉर्मवरून काढण्यात येणार आहेत. कंपनीने या वर्षी युजर्सना लोकेशन हिस्ट्रीसह त्यांचा डेटा डाउनलोड करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. ज्यानंतर ते काढले जाईल. फेसबुकने स्पष्ट केले की ते “इतर अनुभवांसाठी” युजर्सच्या लोकेशनची माहिती गोळा करणे सुरू ठेवेल.

Share This News
error: Content is protected !!