‘हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा’ प्रसाद लाड यांचे शिवसेनेला आव्हान

474 0

मुंबई- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून राज्यातील विविध नेत्यांनी टीका केली आहे.

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी तर शिवसेनेला आव्हानच दिले आहे. शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून दाखवावी, याकरिता वैयक्तिक मी स्वतः त्यांच्याबरोबर यायला तयार आहे…, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर हॅन्डल वरून त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/PrasadLadInd/status/1526118263562063872

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आता सदर प्रकरणाचा निषेध केला आहे. एखादा राजकारणी बाहेरून येऊन औरंगजेबच्या समाधीला जातो या गोष्टीचा मी निषेध करतो, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात कुठेतरी जातीपातीचे राजकारण होत असून त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही त्याने इथे येऊन राजकारण करू नये, अशा शब्दात शरद पवारांनी ओवेसींना बजावले आहे.

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. त्यावरून सर्व नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता.

Share This News
error: Content is protected !!