जेवण बनवताय ? जरा सावधान ! नाहीतर या बाईसारखी तुमची अवस्था होईल, पाहा व्हिडिओ

524 0

स्वयंपाकघरात स्वयंपाक करणे सोपे नसते. एखादा पदार्थ मोठ्या कष्टाने केल्यानंतर खाणाऱ्याला तो आवडतो की नाही याची सुद्धा चिंता बनवणाऱ्याला असते. शिवाय हाताला भाजणे, चटके बसणे हे तर नित्याचेच असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी स्वयंपाक करत आहे. मोठ्या उत्साहात ती ती जेवण बनवतानाचा व्हीडिओ शूट करत आहे. इतक्यात स्वयंपाकघरामध्ये अशी काही घटना घडते की तिची भलतीच तारांबळ उडते. स्वयंपाक करताना आजूबाजूला धुराचे लोट दिसायला लागतात. काही वेळातच तिच्या लक्षात येतं की तिच्या मागच्या पॅनला आग लागली आहे. यानंतर ती आग विझवण्यासाठी ती बेसिनजवळ पॅन घेते. पण आग कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढते. हा मजेदार व्हिडिओ तुम्ही पहिला तर नक्कीच तुमची हसून हसून पुरेवाट होईल.

Share This News
error: Content is protected !!