दुर्दैवी ! जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना यंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

510 0

नेवासा – जनावरांसाठी कडबाकुट्टी करताना दुर्लक्ष झाल्यामुळे एका महिलेचा पदर यंत्रात अडकला. यंत्रात फिरणाऱ्या बेल्टसहित महिला यंत्रामध्ये ओढली गेली. कडबाकुट्टी यंत्राच्या मागील बाजूला डोके आपटून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगाव येथे घडली.

सरिता अजिनाथ गवते (वय २५ ) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की सरिता आणि तिचे पती अजिनाथ आज सकाळी ७ वाजता जनावरांसाठी कडबाकुट्टी करत होते. यावेळी सुरक्षा झाल्यामुळे सरिता यांचा पदर यंत्रामध्ये अडकला. हा पदर यंत्रात एवढ्या वेगात ओढला गेला की सरिता यांचे डोके यंत्राच्या मागील बाजूस जोरात आपटले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. इतक्यात आसपासच्या लोकांनी धाव घेऊन सरिता यांना बाजूला घेतले.

त्यांना ताकदीने उपचारासाठी दवाखान्यात नेट असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. सरिता यांना ३ वर्षाचा मुलगा आणि ११ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!