नेटफ्लिक्स फुक्कट वापरणे बंद होणार ! त्यासाठी कंपनी करणार महत्वाचा बदल… जाणून घ्या !

280 0

नवी दिल्ली- नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या सगळेच उड्या घेताना आपण पहातो. विशेषतः अशा ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती देतात. परंतु या प्लॅटफॉर्म्सवरील कंटेंट पाहण्यासाठी याचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. अनेकजण दुसऱ्याच्या नेटफ्लिक्स अकाउंटवरून मोफत कन्टेन्टचा आनंद घेतात. आपण आता त्यांना या आनंदापासून मुकावे लागणार आहे.

नेटफ्लिक्स जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. नेटफ्लिक्स कंपनी महत्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे अशी माहिती पुढे आली आहे. युजर्स आपल्या नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड आपल्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करू शकणार नाही. द न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार यावर्षाअखेरीस ऑक्टोबर 2022 पर्यंत नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग बंद करू शकते.

Share This News
error: Content is protected !!