मोठी बातमी! राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियन मधून हकालपट्टी

178 0

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियनमधून हकालपट्टी करण्यात आली असून तर, त्यांचे बंधू नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.

चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन म्हणजेच बीकेयू त्यांच्या पुण्यतिथीदिनीच दोन गटात विभागली गेली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन बीकेयू (अराजकीय) स्थापन करण्यात आली. राकेश टिकैत हे दोन दिवस लखनऊमध्ये राहून डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतले होते, मात्र त्यांना यश आले नाही. संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून राजकारणाकडे जात असल्याने अनेकजण टिकैत यांच्यावर नाराज आहेत.

Share This News
error: Content is protected !!