थॉमस कपमधील विजयाने देशवासियांना अवर्णनीय आनंद – अजित पवार

344 0

‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला 3-0 असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे.

या विजयानं भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे.

तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!