राष्ट्रवादीची गुंडगिरी सहन करणार नाही; भाजपाचा इशारा

376 0

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

भाजपचे  विनायक आंबेकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गुंडांनी त्यांच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ केली आणि हल्ला केला, या घटनेचा मुळीक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

मुळीक म्हणाले, पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनावर शासनाचा वचक राहिलेला नाही. आता राष्ट्रवादीचे गुंड कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच आघाड्यांवर येत असलेल्या अपयशामुळे खचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. जनता या अराजकतेला कंटाळली असून, महाविकास आघाडीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

मुळीक पुढे म्हणाले, ‘शहर भाजपच्या वतीने फडगेट पोलीस चौकीत तक्रार नोंदविली आहे. हल्लेखोरांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन केले जाईल.’

Share This News
error: Content is protected !!