गाढवाने लाथ मारायच्या आधी…;फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समाचार

326 0

१ मे महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी ‘बुस्टर डोस’ सभा होती.

या पोलखोल यात्रेतून भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली होती. यावेळी बोलताना फडणवीसांनी चौफेर टीका सुरु केली होती.

यावेळी फडणवीस म्हणाले होते कि, हनुमान चालिसा म्हटल्याने राजद्रोहचा गुन्हा दाखल करता, तुमचं हिंदुत्व गदाधारी नाहीतर गधाधारी असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता. यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर उत्तर दिल आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, शेवटी गाढव ते गाढव. घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी आम्हाला लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गधाधारी’ या टीकेला उत्तर दिले. शिवसेनेचे हिंदुत्व हे ‘गधाधारी’ असल्याची टीका काही दिवसांपूर्वी केली होती. ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आज झालेल्या सभेत बोलत होते

Share This News
error: Content is protected !!