स्वतःचा जीव धोक्यात घालून चिमुकलीला वाचवणारा हिरो, पाहा थरारक व्हिडिओ

508 0

नवी दिल्ली- अनेकवेळा लोक आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवताना दिसतात. अशा घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरला आहे.

हा व्हिडिओ कझाकिस्तानमधील असून सोशल मीडियावर गुड न्यूज करस्पाँडंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आठव्या मजल्यावर टॉवर ब्लॉकच्या खिडकीतून एक लहान मुलगी बाहेर लटकत असल्याचं दिसतंय. तिला वाचवण्यासाठी एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून इमारतीवर चढते आणि तिला वाचवते. हा व्हिडिओ पाहताना खरोखरीच अंगावर काटा येतो.

या न्यूज करस्पाँडंटने म्हटले आहे की, ‘सबित शोंटकाबाओ काल एका मित्रासोबत जात होता, तेव्हा त्याला एका इमारतीच्या 8 व्या मजल्यावर खिडकीतून एक लहान मुल बाहेर लटकत असल्याचं दिसलं. याा मुलीला वाचवण्यासाठी सबित बिल्डिंगमध्ये गेला आणि अपार्टमेंटमध्ये जात तिला वाचवलं’ ट्विटरवर हा व्हिडिओ 15 हजारहून अधिक जणांनी पाहिला आहे.

Share This News
error: Content is protected !!