महत्वाची बातमी ! राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

188 0

मुंबई- मनसे नेते राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून आता एक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणार आहेत. 

अलीकडेच राज ठाकरे यांना धमक्या आल्या आहेत अशी तक्रार मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचं पत्र मिळाल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!