पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

704 0

पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खबरदारी म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. इतकंच नाही तर काही काळासाठी रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली होती.

बॉम्ब शोधक नाशक पथकाने सापडलेली बॉंब सदृश्य वस्तू काळजीपूर्वक घेऊन पुणे रेल्वे स्टेशनजवळील मैदानावर नेण्यात आली. त्याठिकाणी तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

“सापडलेली वस्तू ही जिलेटीन नव्हती. कोणीतरी जाता जाता ती वस्तू सोडून गेले असावेत. ही वस्तू फटाक्यांसारखी होती, पण ती मोकळी त्यात फक्त वायर होत्या,” अशी माहिती देण्यात आली. या घटनेनंतर तासाभराने पुणे रेल्वे स्टेशवरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!