नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

371 0

मुंबई- ईडीच्या अटकेमध्ये असलेले मंत्री नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला नसला तरी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना मुंबईमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. जे. जे. रुग्णालयाऐवजी मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, ईडीने त्याला विरोध दर्शवला होता.

न्यायालयाने मलिक यांच्या वैद्यकीय अहवालाबरोबरच जे. जे.मध्ये आवश्यक सुविधा आहे की नाहीत, याचा अहवाल देण्याचे निर्देश ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर न्यायालयाने मलिक याना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र उपचारादरम्यान केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!