मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून हिंगोलीतील कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

243 0

मुंबई- मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राजू चन्नाप्पा हुलगुंडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धाव घेत राजू हुलगुंडे यांना ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!