राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

168 0

गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली. मात्र भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला.राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद तर भाजपने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!