Supriya Sule

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईचा प्रश्न सोडवा, सुप्रिया सुळे यांची मागणी (व्हिडिओ)

393 0

पुणे- केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झाले आहे. तर मग पैसे तुमच्यापाशी कशाला ठेवलेत ? महागाई कमी करण्यासाठी सबसीडी द्या . प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारने महागाईचा प्रश्न सोडवायला हवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिपार चौकातील मारुती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी सुळे बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्यासहित पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्य संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपाचा झेंडा उलटा लावत कमळाबाई, महागाईची देवी अशा आरत्या करण्यात आल्या. भष्टाचाराचा निषेधही करण्यात आला .

सुप्रिया सुळे म्हणाल्या,” सातत्याने संसदेत सांगत होते , की महागाई वाढत आहे . पण आपण त्यावर चर्चा करायला हवी होती . ती केली नाही आणि आज महागाई प्रचंड वाढली आहे. आरबीआयने व्याजदर वाढवले. त्याच्याबद्दलही आम्ही एक ते दीड महिन्यांपासून सांगत होतो. आम्हाला हे दिसत होते. केंद्र सरकारला आणि अर्थमंत्रालयाला हे दिसत कसे नाही, असा सवाल त्यांनी केला.

हे आंदोलन एवढ्यावरच थांबणार नसून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, विभागात, तालुक्यात जाणार आणि महागाईच्या मुद्द्यावर आवाज उठवणार, सर्वसामान्य माणूस महागाईमुळे बेजार झाला असून त्यांच्यासाठी जे करणे शक्य आहे ते करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Share This News
error: Content is protected !!