अखेर ठरलंच! पुणे महागरपलिकेची अंतिम प्रभाग रचना ‘या’ दिवशी होणार जाहीर

373 0

सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना येत्या आठवडाभरात जाहीर होणार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

त्यानुसार आता येत्या 17 मे रोजी पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाला 11 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करायचे असून 12 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकारच्या मान्यतेसाठी अंतिम आराखडा सादर करायचा आहे त्यानंतर 17 मे रोजी हा अंतिम प्रभाग आराखडा जाहीर होणार आहे.

पुणे पिंपरी-चिंचवड सह राज्यातील तब्बल 18 हून अधिक महापालिकांचा कार्यकाळ संपला असून, त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासंबंधीचा कायदाही विधिमंडळात एकमताने करण्यात आला आहे. दरम्यान, यासंबंधीच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

Share This News
error: Content is protected !!