उद्यापासूनच केरळमध्ये मान्सून दाखल होणार ‘असानी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होणार ?

268 0

मुंबई- सध्या बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र या वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान तज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. तर मान्सूनचा सुरवात सर्वसाधारण राहिली तरी अंतिम टप्प्याच अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि. 10 मे अर्थात बुधवारीच मान्सून केरळात दाखल होत आहे. नियमित वेळीच त्याचे आगमन होणार असून महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्यासाठी अजून बरेच दिवस आहेत. त्यामुळेच सध्याच्या चक्रीवादळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. तोपर्यंत आणखी काही परिस्थिती बदलू शकते असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

यंदा मान्सूनची सुरुवात सामान्य राहणार असून मध्यानंतर मात्र अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रीय किंवा 100 मीमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी सुरु करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

‘असानी’ चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात उष्ण लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे राज्यात ऊन आणि तेवढ्याच प्रमाणात पाऊसही अशी स्थिती ओढावलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!