खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघा सराईतांना अटक

484 0

पुणे- खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. 

रणजित विलास परदेशी, श्रीनाथ उर्फ शेरू विलास परदेशी , चिराग महेश जोशी अशी तीन आरोपींची नावे आहेत. यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी आज, मंगळवारी शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ तिघांना ताब्यात घेतले. तिघा आरोपींची गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-01 श्रीमती प्रियंका नारनवरे, , सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, पोलीस हवालदार गुंड, राजपूत, फडतरे, साठे, भिवरे, पोलीस नाईक मेमाणे, पोलीस शिपाई राऊत, होळकर यांनी केली.

Share This News
error: Content is protected !!