अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

286 0

श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि निदर्शने सुरु असतानाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत महागाईने कहर केला आहे. हिंसा आणि महागाईपुढे अखेर पंतप्रधानांनी हार मानली आहे.

राजीनाम्यापूर्वी त्यांनी ट्विट केले की, “मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की, हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.

राजपक्षे यांचा राजीनामा देशात हिंसाचाराच्या घटनांदरम्यान देण्यात आला आहे, ज्यामध्ये किमान 16 लोक जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात कर्फ्यू लागू केला. महिंदा राजपक्षे (76) यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. या दबावाविरुद्ध ते पाठिंबा गोळा करत होते. मात्र अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.

Share This News
error: Content is protected !!