भररस्त्यात डुप्लिकेट सलमान खानने शर्ट उतरवला अन् पोलिसांनी घेतलं ताब्यात

333 0

मुंबई- सलमान खान म्हणजे तरुणांच्या दिलाची धडकन, तरुणींचा क्रश. त्याची प्रत्येक अदा लोकांना वेड लावणारी. शर्ट काढून आपली बॉडी दाखवण्याची त्याची स्टाइल अनेकांना आवडते. अशाच एका डुप्लिकेट सलमान खानने भर रस्त्यामध्ये शर्ट काढून त्याची कॉपी केली. पण पोलिसांनी या डुप्लिकेटला आपल्या ताब्यात घेऊन आपला इंगा दाखवला.

लखनौमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा डुप्लिकेट सलमान त्याचे कपडे उतरवून आपल्या बॉडीचे प्रदर्शन करताना, सलमान सारखी ऍक्शन करताना दिसतोय. या डुप्लिकेट सलमानला असे करणे महागात पडले आहे. पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंगाचे कलम लावून दंडही वसूल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!