धर्मवीर’ चित्रपटाचे ट्रेलर उत्साहात लॉन्च; सोहळ्याला सलमान खानची हजेरी (व्हिडिओ)

247 0

मुंबई- धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी अत्यंत दिमाखात हा सोहळा पार पडला.

यावेळी नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अभिनेता सलमान खान, अभिनेता रितेश देशमुख उपस्थित आहेत. मुंबईतील वांद्रे येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे यांचं आयुष्य ‘धर्मवीर‘ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

या चित्रपटात आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाची उत्सुकता सर्वांना लागली असून हा सिनेमा १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=rI3j90IB4Ac

Share This News
error: Content is protected !!