फक्त 1 रुपयात इडली; मजुरांची काळजी घेणाऱ्या अम्मांला आनंद महिंद्रांची अनोखी भेट

386 0

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदर्स डे निमित्त तामिळनाडूमधील इडली अम्माला एक अप्रतिम भेट दिली आहे. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी घर भेट दिले आहे. त्यांनी याबाबत आनंदही व्यक्त केला आहे.

इडली अम्माचे खरे नाव एम. कमलाथल आहे. 85 वर्षीय इडली अम्मा तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील आहेत. अम्मा या भागात काम करणाऱ्या मजुरांना आणि इतरांना फक्त एक रुपयात इडली खाऊ घालतात. जवळपास तीन वर्षांपासून त्या हे काम करत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत गेली पण त्यांनी आपल्या इडलीची किंमत वाढवली नाही. त्या त्याच दरात लोकांना इडली खाऊ घालत राहिल्या.

आनंद महिंद्रा यांनी 10 सप्टेंबर 2019 मध्ये इडली अम्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘इडली अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करणं आणि त्यांना चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देणार असल्याचं सांगितलं. ‘, असं त्यावेळी ते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा महिंद्रा यांच्या कंपनीतील काही लोक इडली अम्माला भेटायला गेले तेव्हा त्यांनी नव्या घराची इच्छा व्यक्त केली. त्यांची ती इच्छा आनंद महिंद्रा यांनी आता पूर्ण केली आहे.

इडली अम्माला नवीन घर दिल्याची माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन दिली आहे. ‘मदर्स डे निमित्त मला इडली अम्माला घर द्यायचं होतं. त्यासाठीचं बांधकाम वेळेत पूर्ण झालं. इथून पुढेही त्या असंच लोकांना त्यांच्या आवडीची इडली खाऊ घातलीत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. मदर्स डेच्या शुभेच्छा’, असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलंय.

 

 

Share This News
error: Content is protected !!