पाकव्याप्त काश्मीरमधील चिनी बनावटीचा पूल तुटला, लाइव्ह व्हिडिओ पाहा

508 0

पाकव्याप्त काश्मीर मधील चिनी बनावटीचा एक मोठा पूल बघता बघता तुटला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला आहे. ही घटना गिलगिट-बाल्टिस्तानच्या हुंजा तहसीलमधील आहे. या अपघाताचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ग्लेशियर तुटल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तान आणि चीनला जोडणारा मुख्य हसनाबाद पूल वाहून गेला आहे. पीओकेच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागात काराकोरम हायवेवर हा पूल बांधण्यात आला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तो लगेचच वाहून गेला. महत्त्वाचे म्हणजे हा पूल चीनने पाकव्याप्त भागात बांधला होता. शिशपार ग्लेशियर तुटल्यामुळे ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा पूल चीन आणि पाकिस्तानला जोडणारा मुख्य पूल होता. PoK मधील चीन निर्मित हसनाबाद पूल चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असून ज्यावर चीनने बराच खर्च केला आहे. या दुर्घटनेमुळे पुलाच्या दोन्ही बाजूला हजारो पर्यटक अडकले असल्याचे वृत्त आहे. पूल वाहून गेल्याचा व्हिडिओ पाकिस्तानच्या नवीन हवामान आणि पर्यावरण मंत्री शेरी रहमान यांनीही शेअर केला आहे.

Share This News
error: Content is protected !!