अर्थमंत्री निर्मला सीतारमण स्टेजवर महिला अधिकाऱ्याला पाणी देतात तेंव्हा … व्हायरल व्हिडिओ

389 0

नवी दिल्ली- स्टेजवर भाषण देणारी व्यक्ती बऱ्याचदा पाणी देण्याची विनंती करते. अशावेळी स्टेजच्या मागे उपस्थित असलेली एखादी व्यक्ती त्यांना पाणी देते. पण नवी दिल्लीमध्ये एनएसडीएलच्या गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमात स्टेजवर बोल्ट असलेल्या महिला अधिकाऱ्याने पाणी मागताच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी चक्क त्यांना पाणी दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पद्मजा चंदुरु यांनी भाषणादरम्यान, पाणी मागितले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन त्यांच्याकडे पोहोचल्या. कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये चंदुरू त्यांच्या भाषणाच्या मध्येच थांबतात आणि पाणी मागतात. पाण्याकडे इशारा केल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाण्याची बाटली घेऊन व्यासपीठावर पोहोचल्या. त्यांनी बाटलीमधून पद्मजा यांना ग्लासात पाणी दिले. अर्थमंत्र्यांच्या या कृतीमुळे पद्मजा ओशाळला त्यानंतर पद्मजा यांनी आपले भाषण चालू ठेवले.

अर्थमंत्र्यांच्या हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यानी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Share This News
error: Content is protected !!