नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार ? राणा यांच्या घरावर देखील कारवाई होणार ? नेमके काय होणार ?

471 0

मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर मीडियासमोर न बोलण्याची आत न्यायालयाने जामीन देताना घातली होती. या अटींचे नवनीत राणा यांच्याकडून उल्लंघन झाल्याने आता राज्य सरकार न्यायालयात जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहे. तर दुसरीकडे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा यांच्या वांद्रे येथील घरावर हाथोडा चालवण्याची देखील शक्यता आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. या अति मेनी देखील करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर नवनीत राणा यांनी तर थेटपणे उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांनी कुठलाही मतदारसंघ निवडावा, मी तुमच्याविरोधात उभी राहीन, असे जाहीर आव्हान नवनीत राणा यांनी दिले होते. राणा यांनी मीडियासमोर बोलून न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आता सरकारी वकील प्रदीप घरत न्यायालयात दाद मागणार आहेत. आज सकाळी ११ वाजता न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील घरावर आता महानगरपालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या खार परिसरात राणा दांपत्याची सदनिका आहे. शिवसेनेला आव्हान दिल्यामुळे मुंबई महापालिकेने आपली दृष्टी या सदनिकेवर वळवली. या सदनिकेत अनधिकृत बांधकाम केल्याचा संशय पालिकेला आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेचे एक पथक राणा दाम्पत्याच्या सदनिकेची पाहणी करून आले होते. मात्र, त्यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा मुक्काम तुरुंगात असल्याने ही कारवाई झाली नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आज, सोमवारी या सदनिकेच्या पाहणीसाठी जाणार आहे. या घरातील अनधिकृत बांधकामाचा अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर राणा दांपत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता नवनीत राणा आणि रवी राणा ही संभाव्य कारवाई रोखण्यासाठी काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.

नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार ? राणा यांच्या घरावर कारवाई होणार ? काय होणार ?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide