SOYABEAN

सोयाबीन आयातीची चर्चा निव्वळ अफवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले

57 0

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत(INDIA -US TRADE) राज्यात पसरत असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM DEVENDRA FADNAVIS) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. भारताने कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केली असून अमेरिकन सोयाबीन(SOYABEN) भारतात येणार असल्याची चर्चा पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या सोयाबीनला (SOYABEN) चांगला दर मिळू लागला असताना काही घटकांनी अमेरिकेतील सोयाबीन(SOYABEN) आयात होणार असल्याची अफवा पसरवली. या चर्चेमुळे बाजारात संभ्रम निर्माण झाला आणि सोयाबीनच्या दरात सुमारे ५०० रुपयांची घसरण झाल्याचा दावा त्यांनी केला.

भारत-अमेरिका व्यापार करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही, असे स्पष्ट करत त्यांनी “परदेशातून सोयाबीन (SOYABEN)किंवा कापूस आयात होणार नाही,” असे सांगितले. कृषी क्षेत्रासंदर्भात कोणताही करार करण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले.

काही मतप्रवाह जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Share This News
error: Content is protected !!