MULUND METRO ACCEDENT

मुलुंडमध्ये मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू

100 0

मुलूंड (MULUND)परिसरात सुरू असलेल्या मेट्रो (METRO)बांधकामावेळी अचानक काँक्रीट स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्लॅब खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहन आणि रिक्षावर कोसळल्याने दोन्ही वाहने गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने कोसळलेला स्लॅब हटवण्याचे आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींची संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मेट्रो(METRO) पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधीही मेट्रो प्रकल्पाच्या कामकाजावरून अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या घटनेनंतर बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेच्या निकषांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रशासनाकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

Share This News
error: Content is protected !!