गायिका अमृता फडणवीस (AMRUTA FADNAVIS) यांनी महाशिवरात्रीचं(MAHASHIVRATRI) निमित्त साधून आपलं ‘शंभू रे’ हे नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे भक्तीगीत ‘टी-सीरीज’च्या(T-SERIES) अधिकृत चॅनेलवर लाँच करण्यात आलं असून, अल्पावधीतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
हे गाणं केवळ एक भक्तीगीत नसून त्याचं चित्रीकरण अतिशय भव्य पद्धतीने करण्यात आलं आहे. संगीतकार मॉन्टी शर्मा यांचं संगीत आणि राजीव वालिया यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस एका वेगळ्या रूपात दिसत आहेत. श्रद्धेचा भाव आणि शिवाबद्दलची भक्ती या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
गाणं प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच याला ३१ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यापूर्वीही त्यांनी गायलेलं ‘शिव तांडव स्तोत्रम्’ आणि पावसाळ्यातील ‘सावन’ ही गाणी विशेष गाजली होती. सोशल मीडियावर होणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांवर फारसे लक्ष न देता, अमृता फडणवीस सातत्याने संगीतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. त्यांच्या या नवीन गाण्यातील भक्तीभावाचे अनेक चाहत्यांकडून कौतुक होत आहे.