narhari zirwal

नाशिक, पुणे, नागपूरमध्ये फार्मा पार्कला हिरवा कंदील; आदिवासी भागात 300 आयुर्वेदिक दवाखाने

80 0

राज्यातील औषध संशोधन आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’(INCUBATION PARK) व ‘फार्मा पार्क’(FARMA PARKA) उभारण्याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ(NARHARI ZIRWAL)यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा (J P NADDA) यांची भेट घेतली. या प्रकल्पांना प्राथमिक स्तरावर मान्यता मिळाल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली.

दिल्ली दौऱ्यात नड्डा यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा झाली. विभागासाठी आवश्यक निधीत वाढ करण्यास तत्त्वतः सहमती दर्शविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांच्यासोबत आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य सुविधा बळकट करण्यावर चर्चा झाली. आयुष मंत्रालयाअंतर्गत आदिवासी भागांत सुमारे 300 आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!