DGCA inspection at baramati airpot

रोहित पवारांच्या आरोपांनंतर DGCAची बारामती विमानतळावर तातडीची तपासणी

100 0

अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या घटनेभोवतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हा अपघात होता की नियोजित घातपात, यावरून राज्यातील राजकारणात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून आणि नेत्यांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद(PRESS CONFERENCE) घेत सुमारे दीड तास सविस्तर मांडणी केली. त्यांनी अपघातामागे शंभर टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या आरोपांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आज बारामती विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षिततेबाबतचा अंतिम निष्कर्ष अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून पुढील अहवाल आणि चौकशीतील निष्कर्षांवर अनेक बाबी अवलंबून असणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!