SHARAD PAWAR HEALTH UPDATE

शरद पवारांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांकडून अधिकृत माहिती

78 0

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (SHARAD PAWAR) यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत आहे. रुबी हॉल क्लिनिकचे(RUBI HALL CLINIC) फिजिशियन डॉ. सायमन ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे सर्व वायटल पॅरामीटर्स नियंत्रणात आहेत आणि त्यांची क्लिनिकल स्थिती समाधानकारक आहे.

रुग्णालयात दाखल होताना त्यांच्या छातीत कफ साचल्याचे निदर्शनास आले होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून त्या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांतील धावपळ, व्यापक दौरे आणि सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग यामुळे आलेला थकवा आणि शारीरिक ताण हे प्रकृती बिघडण्यामागील कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असून, प्रकृतीतील सुधारणा कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा विचार आहे. मात्र, अंतिम निर्णय वैद्यकीय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!