devendra fadnavis

DEVENDRA FADNAVIS ON NCPMERGER :राष्ट्रवादी विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले ….

101 0

उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी या विषयावर सूचक पण स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकालानंतर आज 10 फेब्रुवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (SUNETRA PAWAR) यांची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवट्यामुळे त्यांचे स्वागत शब्दसुमनांनीच करण्यात आले, असे फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (CM FADNAVIS) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. अजून त्या विषयावर बोलण्याची वेळ आलेली नाही. जेव्हा निर्णय होईल, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अधिकृतपणे सांगतील. रोज पतंग कशासाठी उडवायचे? असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केला .

सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष (NCP) भविष्यात चांगलं काम करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा देखील उल्लेख केला.

 

Share This News
error: Content is protected !!