महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार (SUNETRA AJIT PAWAR) यांनी मंत्रालयात अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (PRAPHULLA PATEL), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(SUNIL TATKARE)रुपाली चाकणकर (RUPALI CHAKANKAR) यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते अजित पवार(AJIT PAWAR)यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरला.
पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांनी मुंबईतील (MUMBAI) प्रमुख श्रद्धास्थानांना भेट दिली. सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
मंत्रालयातील दालनात प्रवेश करताच त्यांनी प्रथम खुर्चीला आणि नंतर टेबलाला हात जोडून नमस्कार केला. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर पदभार स्वीकारताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले. हा क्षण पाहून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाही अश्रू अनावर झाले, काही काळ उपस्थितांमध्ये शांतता पसरली होती.
पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) आज त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, हे आपले प्रमुख प्राधान्य असेल, असे त्यांनी संकेत दिले.