RITU TAWDE

BJP Mumbai mayor :मुंबई भाजपचं ठरलं! महापौरपदी ‘या’ महिलेला संधी

57 0

 

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदाची सोडत काढण्यात आली असून, या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष(BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालातही भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे (RITU TAWADE), तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय घाडी (SANJAY KHADI)यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घाटकोपर परिसरात रितू तावडे यांचा मजबूत जनाधार असून, त्या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

मुंबई महापालिकेचा महापौर मराठी चेहरा असावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून होत होती. या पार्श्वभूमीवर रितू तावडे(RITU TAWADE)यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. महापौरपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रितू तावडे यांनी समाधान व्यक्त केले. “हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष असून वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असतो,” असे त्यांनी सांगितले.

उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करताना भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून, आता मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर विराजमान होणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!