sunil tatkare & ramdas kadam

सुनील तटकरे गलिच्छ राजकारण करतात; रामदास कदम यांच्या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी

64 0

सुनेत्रा पवारांच्या (SUNETRA PAWAR) शपथविधीच्या वेळेवरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम(RAMDAS KADAM)यांनी या शपथविधीवर आक्षेप घेत सुनील तटकरे(SUNIL TATKARE) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अजित पवारांच्या(AJIT PAWAR) निधनानंतर अवघ्या काही काळातच शपथविधी पार पडल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा कदम यांनी केला असून, हा प्रकार “गलिच्छ राजकारणाचा भाग” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रामदास कदम (RAMDAS KADAM)यांच्या भूमिकेला मंत्री उदय सामंत (UDAY SAMANT)आणि संजय शिरसाट(SANJAY SHIRSAT) यांनीही पाठिंबा दिला आहे. दुःखद घटनेनंतर लगेचच शपथविधी होणे हे सामान्य जनतेला रुचले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADNAVIS) यांनी या संपूर्ण वादाला फेटाळून लावत हा विषय निरर्थक आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात अनावश्यक राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!