bjp mayor

महापौर निवडीत महायुतीची सरशी ; राज्यातील प्रमुख शहरांवर भाजपची पकड मजबूत

67 0

राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये (MUNCIPAL CORPORATION )आज महापौर व उपमहापौर पदांची निवड पार पडली असून या निवडणुकांत भाजप आणि महायुतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. जळगाव (JALGAON), धुळे(DHULE), कोल्हापूर(KOLHAPUR), पिंपरी-चिंचवड(PIMPRI CHINCHWAD), नागपूर (NAGPUR) , अमरावती (AMRAVATI), सोलापूर (SOLAPUR ) आणि नाशिक (NASHIK) या आठ प्रमुख महापालिकांमध्ये नेतृत्व ठरले. काही ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित असतानाही सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये अखेर निवडणूक बिनविरोध पार पडली.

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल (VINAYAK KONDYAL) यांची निवड झाली असून विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला. जळगाव महापालिकेत दीपमाला काळे या भाजपकडून महापौर झाल्या, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी निवडून आले. नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले.

धुळे(DHULE) महापालिकेत तिरंगी लढतीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी बाजी मारली. नांदेडमध्येही भाजपने इतिहास रचत प्रथमच महापौरपद मिळवले असून कविता मुळे महापौर तर दिपकसिंह रावत उपमहापौर झाले आहेत. या निवडीनंतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महायुतीची सत्ता स्थिरावली असून नव्या महापौरांनी विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय गतीला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!