rohit pawar

अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय चर्चांवर रोहित पवारांची खंत ; काय म्हणले ….

100 0

अजित पवारांच्या (AJIT PAWAR) अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर रोहित पवार (ROHIT PAWAR)यांनी दुःख व्यक्त केले आहे. विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, या शोकाकुल वातावरणात राजकीय आरोप प्रत्यारोप तसेच युती विलीनीकरणासंदर्भातील चर्चा अत्यंत दुर्दैवी आहेत.

रोहित पवार(ROHIT PAWAR) म्हणाले की, अजित पवार(AJIT PAWAR) यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर चर्चा होणे अपेक्षित असताना विषय भरकटत असल्याचे दुःख आहे. सध्या राजकीय चर्चांपेक्षा कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची गरज अधिक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कठीण काळात पवार कुटुंब एकत्र उभे असून, शरद पवार(SHARAD PAWAR) यांनी कुटुंबाला एकवटून दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्मारकासाठी योग्य जागेची पाहणी करण्यात आली असून, बारामतीत एक संग्रहालय आणि स्मारक उभारण्याची कुटुंबाची इच्छा आहे.

दरम्यान, विमान दुर्घटनेप्रकरणी खरी परिस्थिती ९ तारखेनंतर स्पष्ट केली जाईल, असे आश्वासनही रोहित पवार(ROHIT PAWAR) यांनी दिले. सध्याच्या घडीला राजकीय चर्चांना विराम देऊन कुटुंबाला शोकातून बाहेर येण्यासाठी वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Share This News
error: Content is protected !!