PARTH PAWAR LAND SCAM: खारगे समितीचा अहवाल प्रलंबित; पार्थ पवार प्रकरणाचा तिढा कायम

93 0

पार्थ पवार (PARTH PAWAR) मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात(MUNDWA LAND SCAM) अद्याप कोणतीही क्लीनचिट(CLEANCHIT) देण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खारगे समितीचा अंतिम अहवाल अजूनही तयार न झाल्याने पुढील कारवाईबाबत अनिश्चितता कायम आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, खारगे समितीचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे अंतिम अहवाल तयार करण्यासाठी समितीची कोणतीही बैठकही झालेली नसल्याचे समजते. त्यामुळे, पार्थ पवारांवरील(PARATH PAWAR) आरोपांबाबत सध्या स्पष्ट चित्र समोर आलेले नाही.

हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)आणि पवार कुटुंबीयांशी संबंधित असल्याने राजकीय वर्तुळात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे, अंतिम अहवाल सादर होण्यास विलंब होत असल्याने प्रकरणातील गूढता अजूनही कायम आहे.

Share This News
error: Content is protected !!