दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणावर सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. दिवंगत अजित पवार (AJIT PAWAR) यांना हे विलिनीकरण मान्य होते आणि 12 फेब्रुवारी रोजी याबाबत अधिकृत घोषणा होणार होती, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
मात्र, अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या राष्ट्रवादी गटाकडून या चर्चांना दुजोरा देण्यात आलेला नाही. गटाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणतेही विलिनीकरण ठरले नव्हते आणि घेतलेले निर्णय हे केवळ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होते.
या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADNAVIS) यांनी प्रतिक्रिया देताना, जर दोन्ही राष्ट्रवादी(NCP) एकत्र येण्याबाबत गंभीर चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी भाजपला (BJP)याची माहिती दिली असती, असे सांगितले होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार(SHARAD PAWAR) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली. अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या राष्ट्रवादीसोबत विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि 12 फेब्रुवारी रोजी त्याची घोषणा होणार होती, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNVIS) सहभागी नव्हते, त्यामुळे त्यांनी यावर बोलणे योग्य नाही, असेही शरद पवार(SHARAD PAWAR) यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील आणि अजित पवार(AJIT PAWAR) यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू होती, असे नमूद करत शरद पवार (SHARAD PAWAR)यांनी विलिनीकरणाच्या चर्चा प्रत्यक्षात झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.