अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे बीड (BEED)आणि पुणे(PUNE) जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. शपथेनंतर त्यांनी कराड येथील प्रीतीसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार (PARTH PAWAR) यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) उपमुख्यमंत्री(DCM) झाल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली असून, त्या जागेसाठी पार्थ पवारांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या कोअर टीमकडूनही त्यांना सहमती असल्याची चर्चा आहे.
पार्थ पवार (PARTH PAWAR) यांनी याआधी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची संसदीय राजकारणात पुनरागमन होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.