chndrakant patil

सगळे पत्ते आधीच उघडणे अपरिपक्वता ; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

85 0

सांगली महापौर निवडणुकीच्या (SANGALI MAYOR ELECTION) पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील(CHANDRAKANT PATIL) यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीबाबत विचारणा केली असता, “सगळे पत्ते आधीच उघडणे याला खेळ म्हणत नाहीत, ती अपरिपक्वता असते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

सांगली महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी(SANGALI MAYOR ELECTION)उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी राजकीय रणनीती योग्य वेळीच जाहीर करणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला.

निवडणुकीतील डावपेच ठरावीक टप्प्यावरच समोर येतात, सर्व काही आधीच उघड करणे राजकीयदृष्ट्या योग्य नसल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यांच्या या विधानामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून, महापौर निवडणुकीतील संभाव्य समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचे डावपेच नेहमीच निर्णायक ठरतात, असेही त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!